प्रतिनिधी/ सातारा
शिवथर (ता. सातारा) गावच्या हद्दीत कॅनॉललगत मित्रासोबत अजित निकम हे बसले होते. यावेळी अनोळखी 6 इसमांनी दोन मोटार सायकलवरून येऊन कोयत्याच्या लाकडी मुठीने डोक्यात मारहाण करून त्याच्यासह मित्राच्या गळयास कोयता लाऊन मारण्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल हॅन्डसेट, एक मनगटी घडय़ाळ व रोख रक्कम 1 लाख 62 हजार रूपये असा एकूण 1 लाख 73 हजार रूपये किमतीचा माल चोरून नेल्याचा गुन्हा 20 एप्रिल 2021 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुह्यातील 5 आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. या पथकाने गुह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहिती आधारे गुन्हा सातारा जिह्यातील तसेच बारामती जि. पुणे येथील आरोपींनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दि. 10 फेब्रुवारी रोजी या 6 आरोपीपैकी सचिन गब्बर भोसले (वय 21, रा. मालगांव ता. सातारा), हरिष पिताजी उर्फ मुतखडय़ा शिंदे (वय 26, रा. पणदरे म्हसोबावाडी ता. बारामती), शेखर बाळु चव्हाण (वय 24, रा. खामगांव साखरवाडी, ता. फलटण), गणेश शिवाजी कोकरे (वय 24, रा. पणदरे म्हसोबावाडी ता. बारामती), माकशा रंगा काळे (वय 36, रा. सुरूर ता वाई) या 4 आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, मधुकर गुरव, मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, विश्वनाथ सपकाळ, अतिष घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, प्रविण कांबळे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमोल माने, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, प्रविण पवार, विशाल पवार, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, शिवाजी भिसे, स्वप्नील माने, नितीन गोगावले, वैभव सावंत, केतन शिंदे, धीरज महाडीक यांनी सहभाग घेतला.