मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिर देवदर्शन यात्रा : सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांचा सत्कार
प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही हिंदू तिथीनुसार 347 वा शिवराज्याभिषेक सोहळा बुधवारी शहापूर येथील शिवाजी उद्यान येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवरायांच्या मूर्तीला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. शिवमूर्तीला दुग्धाभिषेक घालून मंत्रोच्चार करून पूजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किरण गावडे म्हणाले, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना गागा भट यांच्याकडून ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीचा मुहूर्त काढून घेतला होता. या मुहूर्तावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यामुळे प्रत्येक हिंदू बांधवाने तिथीनुसारच शिवराज्याभिषेक दिन तसेच इतर कार्यक्रमही साजरे करावेत. कोरोनाच्या नियमावलीमुळे प्रत्येक शिवभक्ताला शिवाजी उद्यान येथे पोहोचणे शक्मय नसल्याने प्रत्येक गावात शिवमूर्तीसमोर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात बेळगावमधील नागरिकांना उत्तम सेवा दिलेले सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांचा सत्कार शिवप्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला. परंपरा कायम राहावी, यासाठी मोजक्मया कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिर अशी देवदर्शन यात्रा काढण्यात आली. यावेळी बेळगाव परिसरातील शिवभक्त उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अजित जाधव, विभाग प्रमुख आनंद चौगुले, किरण बडवाण्णाचे, चंदू चौगुले, भास्कर पाटील, अंकुश केसरकर, प्रमोद चौगुले, अतुल केसरकर, गजानन निलजकर, अभिजीत अष्टेकर, गजानन पाटील, अमोल केसरकर, नितीन कुलकर्णी, मदन मुचंडी, अनंत कांबळे, विनायक जांगळे, गणेश जांगळे, नामदेव पिसे, विजय कुंटे, ओमकार पुजारी, वसंत आनंदाचे, युवराज पाटील, गिरीश कणेरी, महेश, प्रसाद बाचोळकर, सदानंद मजुकर, मारुती पाटील, केतन मयेकर, वैष्णवी धामणेकर, प्रियांका पावशे, गौतमी पवार, शेखर हंडे, कुरणे मामा यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगाव-खानापूर तालुक्मयातील गावांमध्येही सोहळा साजरा
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केलेल्या आवाहनानुसार बेळगाव व खानापूर तालुक्मयातील गावांमध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. गावातील शिवमूर्तींचे पूजन करून हा सोहळा साजरा झाला. बेळगावमधील सावगाव, धामणे, कंग्राळी बुद्रुक या गावांसह खानापूर तालुक्मयातील गर्लगुंजी येथेही पूजन करण्यात आले.