प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव पुरस्कृत व आपलं बेळगाव आयोजित किल्ला सम्राट 2020 या किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
प्रथम-किल्ले पुरंदर (शाहूनगर), द्वितीय-किल्ले वेल्लोर (भांदूर गल्ली), तृतीय-किल्ले पन्हाळगड (शिवाजीनगर), उत्तेजनार्थ-राजगड (कोनवाळ गल्ली), नळदुर्ग (तुरमुरी), माहितीसाठीचा विशेष पुरस्कार-राजगड-दुर्वा हंडे (कोनवाळ गल्ली) या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून किरण बडवाण्णाचे, अभिजीत अष्टेकर व प्रफुल्ल शिरवलकर यांनी काम पाहिले.
शिवचरित्र प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनिषा जाधव, अरुण घाटगे, प्रणाली चव्हाण यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी उपस्थित शिवप्रेमींना 32 मण सुवर्णसिंहासन व गडकोट मोहिमेविषयी मार्गदर्शन
केले.
या कार्यक्रमाला शहर प्रमुख अजित जाधव, कार्यवाहक विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, विभाग प्रमुख अनंत चौगुले, प्रवीण मुरारी, मदन मुचंडी, अंकुश केसरकर, आशुतोष कांबळे, गजानन पवार, नितीन कुलकर्णी यांसह शिवभक्त उपस्थित होते.