संभाजी महाराजांना वाहिली आदरांजली : मच्छे ते वढू बुद्रुक सायकल प्रवास
प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे 14 मार्च ते 12 एप्रिलदरम्यान महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त अनेक धारकरी धर्मवीर संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी वढू बुद्रुक येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातात. मच्छे येथील धारकऱयांनी सायकलवरून हा प्रवास करून अनोखी श्रद्धांजली वाहिली.
मच्छे येथील काही शिवशंभूभक्त संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी दि. 27 मार्च रोजी सायकलवरून निघाले व दि. 1 एप्रिल रोजी धर्मवीर संभाजी महाराज चौक, बेळगाव येथे पोहोचले. यावेळी जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. या चार दिवसात 800 कि.मी. चा प्रवास त्यांनी सायकलवरून केला. सचिन चोपडे, भोमाणी लाड, किशोर लाड, बबीतेश सुळगेकर, मंजुनाथ सुतार, रोहन कणबरकर, सुनील मिराशी, हरिष पाटील, प्रवीण लाड, आकाश लोहार यांनी हा उपक्रम राबविला. स्वागतप्रसंगी तालुका कार्यवाह कल्लापा पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.