प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही ज्येष्ठ शुक्ल द्वादशी या हिंदू तिथीनुसार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधीवतपणे पूजन करण्यात आले. जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रारंभी प्रेरणामंत्र झाला. संभाजी महाराजांच्या मूर्तीला मंत्रोच्चारात जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. शंकर भातकांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रविवारी होणाऱया शिवराज्याभिषेक सोहळय़ाला सर्व धारकऱयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले. पूजेचे पौरोहित्य रवि जोशी व मुकुंद भिडे यांनी केले.
यावेळी पुंडलिक चव्हाण, अजित जाधव, अंकुश केसरकर, किरण बडवाण्णाचे, गजानन पवार, विजय कुंटे, युवराज पाटील, अमोल केसरकर, उदीत रेगे, मारुती पाटील, अतुल केसरकर, दिगंबर कातकर, गजानन पाटील, अभिजीत अष्टेकर, गजानन निलजकर, शुभम मोरे, विठ्ठल सर, जोतिबा चोपडे, नितीन कुलकर्णी, ओमकार पुजारी, वैभव धामणेकर, आनंद कांबळे, गौरी गव्हाणे, मिथिला अनगोळकर यासह शिवभक्त उपस्थित होते.