सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी भटवाडी येथील शुभांगी कृष्णाजी काेळंबेकर (वय 83) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील सामाजिक कार्यकर्ते शिवप्रसाद कोळंबेकर आणि एक्सल इंडस्ट्रीजचे (रोहा) केमिस्ट विलास कोळंबेकर यांच्या त्या मातोश्री होत तर देवसू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी कोळंबेकर यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, दिर, जाऊ, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.