प्रतिनिधी / बेळगाव
शिवबसवनगर येथील जोतिबा देवालयातर्फे सालाबादप्रमाणे दीपोत्सव व काळभैरव जयंती मंदिर ट्रस्टच्यावतीने आयोजित केली आहे. दीपोत्सव दि. 6 रोजी सायंकाळी 6 वा. होणार असून काळभैरव जयंती दि. 7 रोजी होणार असून सकाळी 7 वा. अभिषेक, सायंकाळी 6 वाजता जन्मोत्सव सोहळा, सायंकाळी 8 वाजता आरती होणार आहे.
दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सवानिमित्त ज्या भगिनींना मंदिर परिसरात रांगोळी व दीप लावायचे आहेत. त्यांनी मंदिराचे पुजारी किंवा व्यवस्थापकांशी संपर्क साधून दि. 5 डिसेंबरपर्यंत नाव नोंदवावे. दीप व रांगोळी मंदिरतर्फे पुरविण्यात येणार आहे. तरी भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंदिर व्यवस्थापन कमिटीच्यावतीने कळविले आहे.