प्रतिनिधी/ बेळगाव
शिवबसवनगर येथे क्वारंटाईनसाठी काही जणांना ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत नुकताच त्या ठिकाणी सर्व्हे करण्यात आला आहे. मात्र, शिवबसवनगर परिसर दाट लोकवस्तीचा आहे. या परिसरात हॉस्पिटल, महाविद्यालये आहेत. तेंव्हा त्या ठिकाणी क्वारंटाईन करू नये, अशी मागणी शिवबसवनगर येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवबसवनगर सेक्शन क्र. 2 मध्ये मुलांच्या हॉस्टेलमध्ये काही जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र हे हॉस्टेल मध्यभागी असल्याने समस्या निर्माण होणार आहे. इतरांना त्याचा धोका आहे. या परिसरात अनेक महाविद्यालये आहेत. हॉस्पिटल तसेच दवाखाने देखील आहेत. तेंव्हा या ठिकाणी कोणालाही ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी निवृत्त अधिकारी एल. व्ही. सिद्धनाळ, डी. एस. जगमयण्णावर, राजू हतरकी, एम. एम. खाजी, एम. आर. कुदरी, एस. एस. खडबडी, बी. बी. होसमनी, ऍड. ए. सी. देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.