प्रतिनिधी / बेळगाव :
सेवाभावी वृत्तीने एकत्र येवून संकटकाळी सामाजिक योगदान देणाऱया अनेक संस्था बेळगावमध्ये कार्यरत आहेत. अशाच संस्थांपैकी एक संस्था म्हणजे शिवबसव ग्रुप. कोरोना संकटाशी सामना करताना लॉकडाऊनच्या काळात या संस्थेचे केलेले कार्य महत्वाचे आहे. सदर संस्थेने 500 लोकांना रोज सकाळी नाष्टा आणि चहा देण्याचे काम कोणताही गाजावाजा न करता केले आहे. एक गोड पदार्थ आणि एक तिखट पदार्थ आणि चहा ही मंडळी सकाळी 8.30 ते 9.30 दरम्यान जागेवर जावून गरजूंना देण्याचा प्रयत्न करत आहेत.
या कार्यक्रमात संजय भांवी, महांतेश देसाई, विनोद कंग्राळकर, बसनगौडा कुलकर्णी, विजय निंबरगी, नारायण पुजारी, विजय तमुचे, महेश खटावकर, प्रभू पाटील, होड्डप्पा पाटील, प्रभाकर हलगेकर, गोपाळ प्रजापती व अन्य मंडळी उपस्थित होते.