प्रतिनिधी /बेळगाव
आधार शिक्षण संस्थेच्या श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजच्या एनएसएस विभागातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. कॉलेजच्या आवारात विद्यार्थी व शिक्षकांनी विविध प्रकारची 50 रोपे लावली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य व संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे, व्हा. चेअरमन डॉ. पूजा बामणे, एनएसएस विभागाचे प्रमुख डॉ. विनोद मन्हाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी एनएसएसचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.