शिवमोगा/प्रतिनिधी
गुरुवारी रात्री शिवमोगा येथे झालेल्या स्फोटानंतर तपास सुरू असताना गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले की, खाण मालक आणि त्याला डायनामाईट पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान प्राथमिक चौकशीत खाण मालक आणि चालकांचे काही दुर्लक्ष असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात असणाऱ्या डायनामाईटचा स्फोट झाला. पोलिसांनी खाण मालक आणि डायनामाईट सप्लायरला अटक केली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घटनेकडे लक्ष देण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली होती.