ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनांची भोपाळमधील व्हीआयपी रस्त्यावर धडक झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती भोपाळच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आज सकाळी दिल्लीहून परतणाऱ्या कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनांना शिवराजसिंह चौहान यांच्या ताफ्यातील वाहनांची धडक बसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनेच एकमेकांना धडकली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
शिवराजसिंह आज सकाळी तपासणीसाठी बाहेर पडले असता तिथे कमलनाथ यांचा ताफा दिल्लीहून भोपाळला परतला. त्यावेळी कमलनाथ याच्याच ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या.