प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळय़ांच्या मदतीने स्वराज्याची निर्मिती केली. शिवरायांचे विचार, त्यांचे चरित्र आजच्या पिढीला समजावे या दृष्टिकोनातून दुर्गामाता दौड काढली जाते. सोमवार दि. 26 पासून यावषीच्या दौडला प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना, मंदिरांना भेटी देऊन तरुणांमध्ये धार्मिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भल्या पहाटे उठून हातात भगवा ध्वज व मुखी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार, आई भवानीचा जागर करत हजारो युवक, महिला, बालचमू दौडमध्ये सहभागी होतात. त्यामुळे बेळगावमध्ये सर्वत्र भगवे वादळ दिसून येते.
मंगळवार दि. 27 रोजीचा दौडचा मार्ग
शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथून दुसऱया दिवशीच्या दौडला सुरुवात होणार आहे. एम. जी. रोड, महर्षि रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वेगेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, गोवावेस स्वीमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड, हरि मंदिर, चिदंबर नगर, हादुगिरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदुर गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, महालक्ष्मी मंदिर, अनगोळ येथे सांगता.