बिग बॉस च्या घरातील मनोरंजनाला जोरदार सुरुवात झाली आहे. आता घरातील स्पर्धक एकमेकांसोबत खऱयाअर्थाने स्पर्धा करायला सुरुवात करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे. मात्र, आठवडाभारतच आता शिवलीला बाहेर पडली आहे. कुठलेही एलिमिनेशन किंवा स्पर्धेमुळे शिवलीला बाहेर पडलेली नसून, तब्येत ठीक नसल्याने तिला वैद्यकीय उपचारांसाठी हे घर सोडावे लागले आहे. ‘या आठवडय़ातील नामिनेटेड सदस्या शिवलीला पाटील यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या काही काळ डाक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता बिग बासच्या घराबाहेर असतील. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद असतील याची कृपया नोंद घ्यावी, असे म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इतर 14 स्पर्धकांसोबत युवा कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलने देखील या घरात एन्ट्री केली होती.
Previous Articleराशीभविष्य
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.