माजी खासदार प्रभाकर कोरे : मान्यवरांच्या हस्ते गळीत हंगामास प्रारंभ
वार्ताहर/ चिकोडी
गेल्या पाच वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे उसाचे उत्पादन कमी होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मात्र, यावषी निसर्गाने साथ दिल्याने काही ठिकाणी चांगले उत्पादन आले आहे. तर काही भागात अतिवृष्टीमुळे उसाचे नुकसान झाले असले तरी यावषी अतिरिक्त उसाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे या वर्षाच्या गळीत हंगामात सुमारे 15 लाख मेट्रिक टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परिसरातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने यंदाचा ऊसदर देण्यात येणार असल्याचे माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.
माजी राज्यसभा सदस्य केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रायबाग तालुक्मयातील सौंदत्ती येथील शिवशक्ती साखर कारखान्याच्या चालू वर्षाच्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व ऊस गाळप शुभारंभ निडसोशी सिद्धसंस्थान मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तर कारखान्याचे संस्थापक, केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे व चिदानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी चिदानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संदीप पाटील, संचालक मल्लिकार्जुन कोरे, भरतेश बनवणे, अजितराव देसाई, तात्यासाहेब काटे, रामचंद्र निशानदार, मल्लप्पा म्हैशाळे, चेतन पाटील, महावीर मिरजी, अण्णासाहेब पाटील, प्रकाश पाटील, बाबासाहेब मोहिते, सुरेश पाटील, तुकाराम पाटील, पिंटू हिरेकुरबर, कारखान्याचे अधिकारी एस. एस. मुल्ला, जे कृष्णान, दौलत कदम, एस. एस. यादव, आय शिवराम, सुनील राजगिरे, प्रवीण टारे, पांडू पडगनवर, राघवेंद्र पत्तार, एस. पी. निपाणी, जे. एस. बेळसे, सचिन परीट, बांदिवडेकर यांच्यासह रायबाग, अथणी, चिकोडी तालुक्मयातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.