ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याच्याकडून धमकीचा फोन आल्याचा दावा केला आहे. आमदार कांदे यांनी याप्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
कांदे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन, कांदे यांच्या मोबाईलवर फोन आला. त्याने त्याची ओळख अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे अशी सांगितली. तसेच मुंबई उच्च न्यायालयात डीपीडीसीच्या निधी वाटपासंदर्भात दाखल केलेली रिट याचिका मागे घ्या. याचिका मागे न घेतल्यास तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगले नसेल, असे त्याने धमकावल्याचे कांदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.