दिल्ली / प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये छत्रपती शिवाजीं च्या पुतळ्याची नुकतीच विटंबना केल्याच्या निषेधार्थ सोमवारी लोकसभेत शिवसेना खासदारांनी निषेध केला आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज सुरू होताच महाराष्ट्रातील शिवसेना खासदार लोकसभेच्या वेलमध्ये घुसले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करत कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका करून घोषणा दिल्या. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.