ऑनलाईन टीम / मुंबई :
कंगना आणि शिवसेना हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. कांगना ने शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका, असे ट्वीट कंगनाने केले आहे.
याआधी काल कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर शिवसेनेवर टीका केली होती.
उद्धव ठाकरे तुला काय वाटतं? तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा सूड उगवलात. आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा अहंकार मोडेल, अशी एकेरी भाषा कंगनाने वापरली होती.