प्रशासनाने घेतला 8 मार्चचा धसका
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला बेकायदा लाल-पिवळा ध्वज हटवावा न हून याच ठिकाणी भगवा ध्वज फडकविण्यासाठी अनुमती द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने 8 मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. प्रशासनाने याचा धसका घेतला असून जिल्हा प्रशासनाने शिवसेना नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदीचा आदेश काढला आहे.
जिल्हादंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवारी यासंबंधीचा आदेश काढला आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे व त्यांच्या सहकाऱयांना 7 मार्च रोजी सकाळी 6 ते 9 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत बेळगाव जिल्हय़ात प्रवेश बंदीचा आदेश बजावण्यात आला आहे.
विजय देवणे व त्यांचे सहकारी बेळगावात येवून प्रक्षोभक भाषणे करुन भाषिक तेढ निर्माण करण्याची शक्मयता आहे. त्यामुळे बेळगावात अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होवू शकते. या पार्श्वभूमीवर सीआरपीसी कलम 144(3) अन्वये बेळगाव जिल्हय़ात प्रवेश बंदीचा आदेश काढण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान सोमवारचा मोर्चा रद्द करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. आपण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी चर्चा करुन या मुद्दय़ावर चर्चेने तोडगा काढता येतो म्हणून मोर्चा रद्द करावा, अशी मागणी केल्याचे जिल्हाधिकाऱयांनी पत्रकात म्हटले आहे.