प्रतिनिधी / सांगली
कोरोना या महाभयंकर विषाणुने देशासह राज्यात हाहाकार माजवीला आहे.या संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत आहेत. सामाजिक बांधीलकी म्हणुन शिवसेना बुधगाव शहर व ग्रामस्थ यांच्याकडून कोरोना रोगाच्या उपाययोजनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रु.(१,११,१११)निधीचा धनादेश सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील,अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम व जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांचेकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी शिवसेना सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील,तालुकाप्रमुख गजानन मोरे,बुधगाव शहरप्रमुख सतिश खांबे,रामदास पाटील,अरविंद पाटील,पी.के.इंगळे,सतिश हिवरे,धोंडीराम पाटील,सतिश मस्के,नेताजी जमदाडे उपस्थित होते.