शिराळा / प्रतिनिधी
शिवसेना शिराळा तालुका प्रमुख संतोष सर्जेराव हिरूगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सांगली जिल्हा शिवसेना उपप्रमुख यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
येथील शिवसेनेचे लोकसभा प्रतिनिधी विश्वासात घेत नाहीत, तसेच तालुका प्रमुख म्हणून पूर्ण अधिकार दिलेले नाहीत. यामुळे शिवसेना वाढीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. या कारणाने मी पदाचा राजीनामा देत आहे. बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून यापुढेही काम करत राहणार आहे.असे राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे.