शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांचा निर्धार
सातारा / प्रतिनिधी :
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते दिवाकर रावते यांच्यासह सर्व वरिष्ठांच्या सुचनेनुसार सातारा नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शहरप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख शिवसेना नेते दिवाकर रावते व शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडूदादा सपकाळ, शिवसेनेचे उपनेते सातारा-सांगलीचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सातारा पालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेने पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार लोकहिताचे घेत असलेले निर्णय आणि सरकारची प्रगती यावर विश्वास ठेवून सातारा शहरातील अनेकांना शिवसेनेच्या प्रवाहात सामील होण्याची इच्छा आहे. नवीन व जुन्या शिवसैनिकांची एकत्रित बांधणी करून सर्वांना बरोबर घेवून पुर्ण ताकदीने शिवसेना पालिकेची निवडणूक लढवणार आहे. नुकतीच सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. येथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असेल.