प्रतिनिधी / वेंगुर्ले:
वेंगुर्ले शहराचे युवासेनेचे शहर अध्यक्ष शेखर सुरेश काणेकर, शाखाप्रमुख नितीश रमाकांत कुडतरकर, परबवाडा शिवसेना शाखाप्रमुख समीर चिंदरकर, युवासेना विभागप्रमुख शुभम श्यामसुंदर नाईक, प्रथमेश यंदे व शुभम हळदणकर यांच्यासह 40 कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
वेंगुर्ले तालुका कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, साईप्रसाद नाईक, ऍड. सुषमा खानोलकर, नगरसेवक धर्मराज कांबळी, नगरसेविका श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, मच्छीमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, मनवेल फर्नांडिस, संतोष गावडे, तुळस सरपंच शंकर घारे, ज्ञानेश्वर केळजी, बाळू प्रभू, बापू पंडित, संदीप पाटील, गणेश गावडे, विजय बागकर, शरद मेस्त्राr, पिंटू नाईक, प्रणव वायंगणकर, दादा तांडेल, प्रकाश धावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुजय गांवकर, राहूल मोर्डेकर, निलय नाईक, नारायण रेडकर, गणेश रेडकर, कौस्तुभ आरोलकर, काका पालव, तारक वेंगुर्लेकर, योगेश रेडकर, शैलेश तुळसुलकर, हर्षल नाईक, चंद्रशेखर केरकर, राजन कुडाळकर, लक्ष्मण देसाई, बाबू कोणेकर, विश्वनाथ आजगावकर, राकेश नाईक, भगवान नाईक, धनंजय नाईक, मंगेश गवंडे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.