प्रतिनिधी/ सातारा
शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांचा रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. घरातील फक्त त्यांच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नंतर पुन्हा त्यांनी तपासणी केली असता आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना काळात ते शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यामुळे फिरत होते. त्यांना कालपासून चक्कर येणे व इतर त्रास जाणवू लागला होता. आज सायंकाळी उशिरा त्यांना सातारा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.