प्रतिनिधी/ म्हसवड
माण तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असलेल्या दहिवडी नगरपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षातील प्रमुख नेतेमंडळींनी सत्तेसाठी रणकंदन केले आहे.तिरंगी लढतीमुळे कोणत्याच प्रभागात विजयाची कोणीच खात्री देऊ शकत नाही.मात्र यात बाजी मारत शिवसेनेच्या शेखरभाऊ गोरेंनी आपली बहिण सौ.सुरेखाताई पखाले यांना प्रभाग क्रमांक एक मधून नगरपंचायतीच्या इतिहासात पहिल्यादांच बिनविरोध होण्याचा मान मिळवून देत नेतृत्वाची झलक दाखवत नगरपंचायतीच्या निवडणूकीत चमत्कार घडवला आहे.सुरूवातीला विरोधी पक्षाकडून शिवसेनेला नगण्य समजले जात असताना त्याच शिवसेनेने पहिल्या व दुस्रया टप्प्यातील निवडणूकीतही तगडे उमेदवार देत प्रचारात्मक आघाडी घेत आपली ताकद दाखवून दिलीय.तिरंगी लढतीमुळे कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद यश मिळेल असे कोणीही खात्री देऊ शकत नाही.अजून निकाल येणे बाकी असले तरी सत्तेच्या चाव्या व सत्तेची सूत्र आपल्याकडे कशी येऊ शकतात हे बिनविरोधच्या खेळीत शेखरभाऊ गोरेंनी दाखवून दिले आहे.
दहिवडी ता.माण येथील नगरपंचायतीच्या निवडणूकीत पहिल्या टप्प्यात 13 जागांची निवडणूक झाली आहे.तर उर्वरित 4 जागांची निवडणूक दि.18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.या निवडणूकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेकडून सौ.सुरेखाताई पखाले ,
भाजपमधून सौ.वंदना नितीन कटपाळे , राष्ट्रवादीतून उमेदवार सौ.प्रियंका प्रशांत पोळ तर
कॉग्रेसमधून सौ.कांताबाई राजेंद्र पोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांनी आपल्या बहिणीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी तिनही उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले.या तीनही उमेदवारांनी शेखरभाऊंच्या शब्दाला मान देत अर्ज माघारी घेतल्याने दहिवडी नगरपंचायत प्रभाग क्रमांक 1 मधून सौ.सुरेखाताई पखाले यांनी शिवसेनेच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका होण्याचा मान मिळविला.
दहिवडी नगरपंचायतच्या निवडणूकीत शिवसेना पँनेल सोडा पण उमेदवार तरी उभे करतील की नाही अशी चर्चा होती.त्यात दहिवडीतील प्रमुखांनी शेखरभाऊ गोरेंची साथ सोडली होती.अशा परिस्थितीत अचानक शेखर गोरेंनी एन्ट्री करत पुन्हा एकदा लोकांच्यात नवचैतन्य निर्माण करत दहिवडी नगरपंचायत निवडणूकीत जोरदार रंगत आणली.प्रत्येक प्रभागात जशासतसे उमेदवार देत प्रचारात आघाडी घेत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शिवसेनेची ताकद दाखवून दिली.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये सौ.सुरेखाताई पखाले यांच्या निवडीसाठी बजरंग जगदाळे ,दादा काटकर ,मच्छिंद्र दळवी ,अतुल शिंदे ,जगदीश शिंदे, शुभम कोल्हे ,तानाजी कोकरे ,दशरथ कटपाळे ,बाळू कटपाळे ,सचिन थोरात ,खंडू कोकरे ,सौरभ राऊत ,विजय शिंदे ,संदीप शेंडे ,हेमंत शिंदे ,अभिजीत शेंडे आदी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. सौ.सुरेखाताई पखाले यांची बिनविरोध निवड झाल्याने प्रभागातील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
बिनविरोध निवडीबद्दल सौ.सुरेखा पखाले यांचे खासदार अनिल देसाई ,नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे ,गृहराज्यमंत्री ना.शंभुराजे देसाई,माजी मंत्री दिवाकर रावते ,शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील ,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव ,शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांनी अभिनंदन केले आहे.