प्रतिनिधी/ बेळगाव
शहर महाराष्ट्र एकिकरण समिती व कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 8 रोजी शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वा. कोनवाळ गल्ली येथे हा कार्यक्रम होणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात शिवसेनेने 67 हुतात्मे दिले आहेत. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सीमाप्रश्न आजही जीवंत आहे. त्यामुळेच त्यांना प्रतिवषी सीमाबांधव अभिवादन करून त्यांचे स्मरण करीत असतात.
यावेळी सर्व म. ए. समितीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे व सिंहगर्जना युवक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गवळी यांनी केले आहे.