आचरा/ प्रतिनिधी-
करोना माहामारीत चिंदर शिवसेनेतर्फे मदतीसाठी पुढाकार घेत चिंदर कुडोपी फाटा येथे आचरा-चिंदर विभागीय पदाधिकारी शिवसैनिक तसेच विद्यमान चिंदर ग्रामपंचायत सदस्य पप्पू परूळेकर ह्याच्या सहकार्याने आमदार वैभवजी नाईक ह्याच्या मार्गदर्शनाखाली चिंदर येथील महिला बचत गटातील शेतकरी महिलाना भुईमूग लागवडीसाठी मोफत भूईमूग बी वाटप करण्यात आले.त्यावेळी विनायक परब,जगदीश पांगे, राजन गावकर, समीर हडकर, अनिल गावकर ,पप्पू परूळेकर, दिगबंर पडवळ, विल्यम फर्नाडिस, पंचक्रोशितील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.