प्रतिनिधी /बेळगाव
नुकत्याच झालेल्या बडस-बाकनूर-बेळवट्टी व धामणे (एस) निवडणुकीमध्ये ग्राम पंचायतीवर भगवा फडकला. मराठीपण टिकवून ठेवण्यामध्ये या सदस्यांनी यश मिळविल्याने बुधवारी शिवसेनेतर्फे सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
ग्रा. पं. अध्यक्ष म्हाळू मजूकर, सदस्य विठ्ठल पाटील, रेणूका सुतार, रेश्मा कुलम, रूपा सुतार, अनुराधा कांबळे यांचा शाल, फेटा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, महेश टंकसाळी, राजू कणेरी व शिवसैनिक उपस्थित होते.