बेळगाव / प्रतिनिधी
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून व्हॅक्सिन डेपो येथे वृक्षारोपण करण्यात आले. सेव्ह व्हॅक्सिन डेपो हे अभियान सध्या राबविण्यात येत असून शिवसेनेने त्याला प्रोत्साहन दिले आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शिवसेना आरोग्य केंद्राचे जिल्हाप्रमुख दत्ता जाधव, सामाजिक कार्यकर्ते विरेश हिरेमठ, चंद्रकांत कोंडूसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख दिलीप बैलूरकरण् सागर पाटील, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, राजकुमार बोकडे, प्रविण तेजम, प्रकाश राऊत, सुनिल बोकडे, विश्वनाथ येळ्ळूरकर, विनायक जाधव, प्रदिप सुतार, उदय पाटील, मारूती परीट, महेश गावडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.