वाशिम/प्रतिनिधी
भाजप नेते किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी देगडफ़ेक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान गुरुवारी सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला जाणार असल्याचं जाहीर केलं होत. नियोजनाप्रमाणे ते आज वाशिमला जाताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करत शाई फेकली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या गुंडांनी माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचं भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे. सोमय्या यांनी आपल्या गाडीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गाडीवर शाई फेकण्यात आल्याचं दिसत आहे. सोमय्या यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केल्याचा आरोप करत त्यांना गुंड असं म्हटलं आहे.
दुपारी पाऊणच्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये सोमय्या यांनी दोन फोटो पोस्ट केलेत. हा सर्व घटनाक्रम साडेबाराच्या सुमारास घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ ही घटना घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.