प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर सार्वजनिक मडळांच्या गणपतींचे विसर्जन सकाळ पासून सूरु झाले असून पोलीस प्रशासनाने नियोजित आखुन दिलेल्या मार्गावरुन गणेश मंडळांचे मार्गक्रमण सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडाळ्याच्या कार्यकर्त्यांना सुरक्षित अंतर राखत कोरोना नियमावली पाळण्याच्या सुचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. तसेच मर्यादित मंडळांच्या कार्यकर्त्यांना सहभागी करुन घेत विसर्जन सूरु आहे.
शिवाजी चौकातील नवसाला पावणाऱ्या २१ फुटी महागणपतीचे ही विसर्जन पार पडले आहे. रविवारी दुपारी . तसेच इराणी खान सार्वजनिक गणेश विसर्जन दुपारी 4 .30 पर्यंत मंडळाच्या मूर्ती 378 तर घरगुती मूर्ती 435 विसर्जीत केल्याचे नोंदीत आहे.