ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘तान्हाजी’ या चित्रपटातील दृष्यांना मार्पिग करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर तानाजी मालुसरेंच्या चेहऱयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा चेहरा लावून चित्रफीत तयार करण्यात आली आहे. तसेच ही चित्रफीत ‘पॉलिटिकल कीडा’ या ट्विटर अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. ही चित्रफीत तात्काळ मागे घेण्याची मागणी शिवपेमींकडून होत आहे.
या चित्रफीतीमध्ये नरेंद्र मोदी व अमित शाह हे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे दाखविण्यात आले आहे. शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे, असे संवादही यात घालण्यात आले असून, चित्रफितीच्या शेवटी दिल्ली इलेक्शन 2020 असे इंग्रजीतील वाक्मय आहे. या चित्रफितीमध्ये कुठेही भाजपचे नाव कुठेही नाही. केजरीवाल यांना यात उदयभान राठोड दाखवले आहे. अमित शाह हे तनाजीच्या वेषात आहेत. तर मोदी शिवाजींच्या वेशात आहेत. या प्रकारामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता आहे.