अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, 17 ऑक्टोंबर पासूनच्या परीक्षांना 21 तारखेपासून प्रारंभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
परतीच्या पावसाचा फटका शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षांनाही बसला आहे. शनिवार (17) पासून सुरु होणाऱया परीक्षा बुधवार (21 ऑक्टोंबर) पासून होणार आहेत. पावसामुळे वीज पुरवठा खंडीत, मोबाईल नेटवर्क जाम या तांत्रिक कारणास्तव या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन राज्य सरकार व विद्यापीठ प्रशासनाने सुरु केले आहे. 31 ऑक्टोंबर पर्यंत परीक्षा घेवून 10 नोव्हेंबर पूर्वी निकाल लावण्याच्या सुचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. यानुसार 1 ऑक्टोंबर पासून पुर्नपरीक्षार्थी तर 10 ऑक्टोंबर पासून नियमीत अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. मात्र लेखणी बंद आंदोलन तसेच ऑनलाईन सॉफ्टवेअरची कमतरता यामुळे परिक्षा विभागाचे नियोजन कोलमडले होते. 17 ऑक्टोंबर पासून या परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा विभागाने सुरु केले होते.
दरम्यान शनिवार पासून
50 हजार विद्यार्थ्यांकडून नोंदणी
एकूण विद्यार्थी संख्या : 74 हजार 17
ऑनलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी : 50 हजार 626
ऑफलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी : 12 हजार 565
अद्याप नोंदणी न केलेले विद्यार्थी : 10 हजार 809