प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिवाजी विद्यापीठातील सर्व वसतिगृह कोविड काळजी केंद्रासाठी जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या गेटनंबर 1 व 6 मधून विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, रहिवासी, महापालिका अधिकारी, प्रशासकीय वाहनांकरीता खुले राहिल. इतरांना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही, तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.
विद्यापीठातील गेट नंतार 8 फक्त कोरोना रूग्णांसाठी खुले राहिल. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाचे विद्यापीठात अतीमहत्वाचे काम असल्यास विद्यापीठात प्रवेश दिला जाईल. तरी संबंधीत महाविद्यालयातील कर्मचाऱयांनी अतिमहत्वाच्या कामाकरीता व परीक्षेच्या कामकाजाकरीताच विद्यापीठात यावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कामाशिवाय कोणीही विद्यापीठात येवू नये.