विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाचा दुसरा दिवस
प्रतिनिधी / कोल्हापूर
नॅक’ पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या फेरीसाठी शिवाजी विद्यापीठात दाखल झालेल्या पिअर टीमने मंगळवारी विद्यापीठातील विविध घटकांशी संवाद साधला. प्राथमिक सोयीसुविधांबरोबर ग्रंथालयातील दुर्मिळ हस्तलिखिते, क्रिडा विभाग, सिंथेटिक ट्रकसह अन्य सुविधांची पाहणी केली.
प्रा. जे.पी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नॅक पिअर टीमने सकाळच्या सत्रात विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, कौशल्य व उद्योजकता व विकास केंद्र, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, मुद्रणालय, आयक्यूएसी कक्ष व क्वॉलिटी बेंचमार्किंग लॅबोरेटरी, पाणी व्यवस्थापन, कमवा व शिका योजना, संशोधनासाठीची उपकरणे आदींची पाहणी केली.
दुपारच्या सत्रात विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी यांच्यासह विविध अधिकार मंडळे, व्यवस्थापन, शासन प्रतिनिधी व विद्यापीठ प्रतिनिधी यांच्यासमवेत संवाद साधला. उद्या नॅक समितीच्या पाहणीचा अंतिम दिवस असून उर्वरित विभाग व सुविधा, गोपनीय अहवाल अंतिम करण्यासह अन्य बाबी पूर्ण केल्या जातील.
या वेळी माजी विद्यार्थी म्हणून आयोमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ मंदार नानसकर, पुण्यातील एनसीएलचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी. पी. वडगावकर , वस्तू व सेवाकर कोल्हापूर विभागाचे सहआयुक्त तेजस्विनी मोरे, विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे निमंत्रक डॉ. प्रवीण कोडोलीकर उपस्थित होते