बी.ए. भाग -3 च्या अभ्यासक्रमावर आधारित दहा पेपर्सच्या क्रमिक पुस्तकांचे प्रकाशन : इतिहासाच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके मिळणार
संजीव खाडे/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाने इतिहासाच्या अभ्यासक्रमावर आधारित क्रमिक पुस्तकांची निर्मिती करून ती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. बी. ए. भाग 3 च्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांपासून या निर्मितीला प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने (बोर्ड ऑफ स्टडिज् : हिस्ट्री) क्रमिक पुस्तके निर्मिती समन्वय उपसमिती आणि संपादक मंडळ गठित केली असून या संयुक्त बैठकीनंतर कामही सुरू करण्यात आले आहे. नव शैक्षणिक वर्षात इतिहास ाची शिवाजी विद्यापीठ निर्मित आणि प्रकाशित पुस्तके विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळणार आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके अथवा सुपर गाईडची निर्मिती आणि प्रकाशन खासगी प्रकाशन संस्थांच्या वतीने गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. खासगी प्रकाशक एखाद्या लेखकाकडून अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक लिहून घेतात आणि ते प्रसिद्ध करून बाजारात विक्रीला आणणात. या पुस्तकांवर जरी विद्यापीठाचा लोगो अथवा नाव असले तरी पुस्तक प्रकाशन करण्यापूर्वी विद्यापीठाची परवानगी घेतलेली नसते. गेल्या महिन्यात विद्यापीठाच्या बीए इतिहासाच्या अभ्यासक्रमावर आधारित एका खासगी प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेल्या मजकुरातील आक्षेपार्ह शब्दप्रयोगानंतर वादंग निर्माण झाले. त्यानंतर आपल्याच इतिहासाच्या अभ्यासक्रमावर आधारित क्रमिक पुस्तक आपणच का प्रसिद्ध करू नये? असा विचार शिवाजी विद्यापीठातील तज्ञांच्या पुढे आला. त्यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याबरोबर ही कल्पना शेअर केली. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला. इतिहास अभ्यास मंडळ, क्रमिक पुस्तके निर्मिती समन्वय समिती आणि क्रमिक पुस्तके निर्मिती संपादक मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यांच्या संयुक्त बैठकीनंतर संपादक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बीए भाग 3 च्या इतिहासाच्या अभ्यासक्रमावरील पुस्तकांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कामालाही सुरूवात झाली आहे.
एखादी घटना घडल्यानंतर त्यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. इतिहासाच्या क्रमिक पुस्तक निर्मितीबाबतही त्या पद्धतीने प्रयत्न केला. इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अवनिश पाटील आणि सदस्यांनी स्वतःहून पुढे येत पुढाकार घेतला. इतिहासाचे विद्यार्थी, अभ्यासक, सर्वसामान्यांपर्यंत अभ्यासपूर्ण मांडणी असलेले दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याची जबाबदारी घेतली. पुस्तक निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असून चार महिन्यात प्रत्यक्षात पुस्तके तयार करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत. –डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ
बीए भाग 3 च्या अभ्यासक्रमातील दहा पेपरवर आधारित दहा क्रमिक पुस्तके तयार करून ती विद्यापीठाला सादर केली जातील. त्यानंतर विद्यापीठ ती पुस्तके मुद्रित करून प्रकाशित करेल, नव्या शैक्षणिक वर्षात ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. –डॉ. अवनिश पाटील, इतिहास विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ
बोर्ड ऑफ स्टडिज् हिस्ट्री (इतिहास अभ्यास मंडळ)
अध्यक्ष ः डॉ. अवनिश पाटील, शिवाजी विद्यापीठ, सदस्य ः डॉ. धनाजी मासाळ, सातारा, डॉ. संघमित्रा सरवदे, हातकणंगले, डॉ. दीपक जाधव, सातारा, डॉ. सुप्रिया खोले, हुपरी, डॉ. मधुकर जाधव, हलकर्णी, डॉ. निवास वरेकर, विटा, डॉ. सुरेश चव्हाण, गडहिंग्लज, डॉ. राजश्री निकम, रेठरे बुदुक, डॉ. मंजिरी कामत, मुंबई, डॉ. चंद्रकांत अभंग, कोल्हापूर, डॉ. अरूण भोसले, कोल्हापूर, डॉ. भारतभूषण माळी, वाळवा, डॉ. अमर आडके, कोल्हापूर.
क्रमिक पुस्तके निर्मिती समन्वय समिती
अध्यक्ष ः डॉ. धनाजी मासाळ, सातारा, सदस्य ः डॉ. सुरेश चव्हाण, गडहिंग्लज, डॉ. राजश्री निकम, रेठरे बुद्रुक.
क्रमिक पुस्तके निर्मिती संपादक मंडळ
डॉ. अवनिश पाटील, शिवाजी विद्यापीठ, डॉ. निरंजन कुलकर्णी, हातकणंगले, डॉ. कविता गगराणी, कोल्हापूर, डॉ. चंद्रवदन नाईक, निपाणी, डॉ. भारतभूषण माळी, वाळवा. डॉ. खंडू शिंदे, रूकडी, डॉ. श्रीधर शिंदे, मिरज, डॉ. सुरेश शिखरे, कोल्हापूर.
इतिहासाच्या बीए भाग 3 ची तयार होणारी दहा पुस्तके
1) प्रारंभीचा इतिहास, 2) मध्ययुगीन भारताचा इतिहास (1206-1526) 3) क्रांत्यांचे युग, 4) मराठÎांचा राजकीय इतिहास, 5) इतिहासाचे सिद्धांत, 6) प्राचीन भारत, 7) मध्ययुगीन भारताचा इतिहास (1526-1707), 8) आधुनिक जगाची निर्मिती, 9) मराठेकालिन राजनीती आर्थिक व सामाजिक परिस्थिती, 10) इतिहासाच्या पद्धती आणि उपयोजन.