रू.1 कोटीचे 156 ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स प्रदानपीएमकेअरफंडलारू. 1 कोटीचीमदत
प्रतिनिधी / पणजी
शिवानंद फाऊंडेशनतर्फे गोवा सरकारला कोविड विरूद्ध लस देण्यासाठी 156 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची भेट देण्यात आली. बाजारपेठेत याची किंमत सुमारे 1 कोटी रूपये आहे.
शिवानंद फाऊंडेशनचे डॉ. अवधूत शिवानंदजी यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आभार मानले आहे. गोवा राज्यातील शिवानंद फाऊंडेशनचे समन्वयक सुनिल पेडणेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भेट घेऊन तशा आशयाचे पत्र सादर केले, यावेळी गौरव पेडणेकर हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे डॉ. श्यामा प्रसाद स्टेपअप इस्पितळात ही मदत देण्यात आली. यावेळी उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी गुरूदास देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मामु हेगे व डॉ. श्यामा प्रसाद स्टेप अप इस्पितळाचे अधिकारी संदीप वर्ळीकर उपस्थित होते. शिवानंद फाऊंडेशनचे कार्य देशभरात चालू असून हरयाणा, राजस्थान, कर्नाटक राज्यालाही मदत केली असून डॉ. शिवानंद व इशान शिवानंद यांनी पंतप्रधान कोविड निधीला एक कोटी रूपयांची देणगी दिली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या मदतीबद्दल आपल्या फेसबूक खात्यावरुन शिवानंद फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले आहे. सढळ हस्ते केलेल्या या मदतीमुळे कोरोना रुग्णांना अधिक चांगली सेवा देण्यास मदत होणार आहे, त्याचबरोबर अन्य संस्था व व्यक्तींनाही या देणगीतून प्रेरणा मिळणार आहे, असे म्हटले आहे.