वार्ताहर /शिवोली
शिवोली येथील मार्ना ते म्हापसा मार्गावर घातलेली पाईपलाईन फुटल्याची घटना बुधवारी दि. 16 रोजी दु. 1 वा. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली. प्राप्त माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजुला केशकर्तनालय आहे. दुपारी या केशकर्तनालयाच्या बाजुला अचाक मोठा आवाज झाला त्यामुळे पाणी एकदम जोरात बाहेर फेकले गेले. त्यामुळे याठिकाणी नव्याने घातलेला डांबरी रस्ता उखडला गेला व पाईपलाईनमधून आलेले पाणी केशकर्तनालयाच्या दुकानात गेले. यावेळी येथे एक पार्क करुन ठेवलेली दुचाकी काही प्रमाणात नुकसान झाले.
कारवाई व्हावी : संजय बर्डे
मार्ना-शिवोली ते आसगावपर्यंत तीस एमएलडीची पाईपलाईन घालण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नातील 99 प्रकल्पांपैकी एक प्रमुख प्रकल्प होता. या पाईपाईनमुळे या रस्त्याचे डांबरीकरणाचे कामही रखडले होते. हल्लीची या पाईपलाईनची जोडणी करुन त्यावर हॉटमिक्सिंगचे काम करण्यात आले होते. अवघ्या काही महिन्यातच ही पाईपलाईन फुटणे म्हणजे यात काही तर वास येतो. अधिकारी तसेच अभियंते या कामात गुंतले होते. त्यांनी पाईपलाईन घालताना दुर्लक्ष केले त्यामुळे सदर पाईपलाईन फुटली व यावर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते संजय बर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.