मंत्री मायकल लोबो यांची माहिती : जाणून घेतल्या हणजूण वासियांच्या समस्या
प्रतिनिधी /म्हापसा
शिवोली मतदारसंघातील रस्ता पूर्णतः वाहून गेला असून या रस्त्यावर भले मोठे चर पडलेले आहेत. येत्या नोव्हेंबरपर्यंत या रस्तायावरचे भले मोठे चर बुझवून डांबरीकरण करावे. येथे येणारी पाईपलाईन व केबल वर्क पूर्ण करून त्यानंतरच याठिकाणी सर्व मतदारसंघातील रस्ता बीएम व एसी हे डबल लेयर घालून पूर्णतः हॉटमिक्स करावे जेणेकरून प्रत्येक दोन वर्षांनी रस्त्यावर हॉटमिक्स करण्याची पाळी येणार नाही. यामुळे उत्कृष्ट दर्जाचे हॉटमिक्स होईल व यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी हणजूणवासियांच्या समस्या जाणून घेतल्यावर बोलताना दिली. याकामी निविदा तरी दुपट्टीने झाली तर हॉटमिक्स काम चांगले होईल असे ते म्हणाले. बंदीरवाडा सातेरी मंदिरात नागरिकांनी मतदारसंघाच्या व गावच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या असता मंत्री बोलत होते.
यावेळी पंच संदेश खोर्जुवेकर, सरपंच सावियो आल्मेदा, पंच शितल नाईक, शितल दाभोळकर, पंच मंगेश चोडणकर, सातेरी देवस्थान अध्यक्ष मोहन चोडणकर, पंच प्रतिमा गोवेकर, पेद्रू मेंडोसा, हनुमंत गोवेकर, सुरेंद्र गोवेकर, माजी आमदार ऍड. चंद्रकांत चोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हणजुणात 15 एमएलडी पाणी प्रकल्प उभारता येतो
हणजूण गावातील समस्या विविध आहे. लोकांना सर्वप्रथम चांगले रस्ते, रस्त्यापूर्वी त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रश्न हा खूप पूर्वीचा प्रश्न आहे. आणि पाईपलाईनही आलेली आहे आणि तेथे जागाही निश्चित करण्यात आलेली आहे. पाणी ट्रिटमेंट प्रकल्पासाठी स्थानिक आजूबाजूचे सरपंच प्रस्ताव मांडित आहे. पुलाखालील सरकारची जागा आहे येथे हा प्रकल्प उभारून पाणी ट्रिट करून ते लोकांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी 15 ते 20 कोटी खर्च केल्यास येथे 15 एमएलडी पाणी प्रकल्प येथे उभारता येतो अशी माहिती मंत्र्यांनी ग्रामस्थांना दिली.
आता फक्त चर बुझवा व कायमस्वरूपी डबल लेयर हॉटमिक्स करा
याशिवाय जेवढे रस्ते पाणी पाईपलाईन व इलेक्ट्रेशनसाठी खोदलेले आहेत आता त्यांना आणणार व पातळ एसी घालणार आणि सरपंच म्हणणार चांगले डांबरीकरण काम झाले. 6 महिन्यानी रस्ता पुन्हा खराब होणार. कारण हे लेयर पातळ आहेत त्यासाठी बीएम मेकानीम घालून करणे गरजेचे आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणारे काम पुझे एप्रिलमध्ये होऊ द्या. नवीन सरकार येतो तेव्हा होऊ दे त्यासाठी बीएम व एसी पडू द्या अन्यथा पहिल्या पावसातच रस्ता व्हावून जाणार असल्याची माहिती ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी दिली. येत्या पाऊस संपल्यावर सर्व चर बुझवून त्यावर चांगले डांबर घालावे व त्याचा बी एमच्या कामाची निविदा मंजूर करून घ्यावी. तोपर्यंत वीज, पाणी, पाईपलाईन काम पूर्ण करावे व नंतर डबल लेयर हॉटमिक्स करावे अशी माहिती देत सरपंचानी जोपर्यंत डबल लेयर हॉटमिक्स डांबरीकरण होत नाही तोपर्यंत रस्ता आता डांबरीकरण करण्यास देऊ नये असा आदेशही यावेळी मंत्री लोबो यांनी दिला.
अभियंत्याद्वारे रस्त्याची तपासणी करून घेऊ
कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आहे त्यांना आणून येथील रस्त्याची परिस्थिती दाखवून या रस्त्याची तपासणी केली जाईल. त्यांची पाहणी झाल्यावर के अहवाल सादर करणार आहे असा अहवाल त्यांनी यापूर्वी हडफडे, नागवा, कांदोळी, साळपे रस्त्याचा दिला होता व नंतर त्या रस्त्यांना एसी व बीएम डांबरीकरण घातले होते. तशा आशयाचे डांबरीकरण शिवोली मतदारसंघात करुया यासाठी निविदा 5 कोटीची 8 कोटी होईल. निविदा वाढली म्हणून प्रश्न नाही मात्र हे कायमस्वरूपी डांबरीकरण होईल. जेणेकरून प्रत्येकी 2 वर्षांनी हॉटमिक्स करण्याची गरज नाही. पंचायतीने ठराव घेऊन तो ठराव सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्य अभियंत्यांना द्यावे बाकी काम आपण करुन घेतो असे आश्वासन मंत्री लोबो यांनी हणजूण गावातील नागकिरांना आपापल्या गावातील समस्या मांडताना दिले.
हॉटमिक्सबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ
याबाबत येथील सरपंचानी प्रिन्सिपल व मुख्य अभियंत्याना पत्र लिहून फोटोसह येथील रस्ते भूमीगत पाईपलाईन व केबल घातले आहे. व येथील रस्ते आठ वर्षापूर्वीपासून हॉटमिक्स झालेलेच नाही. हे रस्ते खराब झाले आहे त्यामुळे लोकांना येथे चालायलाही होत नाही हे नमूद करून पत्र लिहावे व त्यांची सही घेऊन ते पत्र मुख्यमंत्र्यांना देऊन येथे बीएम व एसी हॉटमिक्स डांबरीकरण करावे अशी मागणी करणार असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली.