आठवीत राज्यात दहिवडीची प्रथम स्वरा टकले तर सातारच्या न्यू इंग्लिश स्कुलचा अथर्व जाधव दुसरा, पाचवीला राज्यात शहरामध्ये द्वितीय छत्रपती शिवाजी हायस्कूल वडुजचा प्रतीक काळे आणि माने देशमुख विद्यालय पाटणची प्रणाली मोळावडे, पाचवीचे 474 तरआठवीचे 478 शिष्यवृत्तीधारक
सातारा / प्रतिनिधी
नुकताच पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाचवीला 474 जण तर आठवीला 478 जण असे एकूण 952 जण शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी बनले.आठवीत राज्यात दहिवडीची प्रथम स्वरा टकले तर सातारच्या न्यू इंग्लिश स्कुलचा अथर्व जाधव दुसरा क्रमांक, पाचवीला राज्यात शहरामध्ये द्वितीय छत्रपती शिवाजी हायस्कूल वडुजचा प्रतीक काळे आणि माने देशमुख विद्यालय पाटणची प्रणाली मोळावडे हिने पटकावला.शिष्यवृत्तीत सातारा जिल्ह्याचा राज्यात पॅटर्न ठरला आहे, अशी माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
जाहीर करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालानुसार इयत्ता आठवी ग्रामीणमध्ये राज्यात पाचवा क्रमांक ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय शिरवळची वैष्णवी बोबडे, राज्यात सहावा क्रमांक जयभवानी विद्यालय पाचवडची आर्या साळुंखे, शहरीमध्ये राज्यात प्रथम शिंदे कन्या विद्यालय दहिवडीची स्वरा टकले, द्वितीय न्यू इंग्लिश स्कुलचा अर्थव जाधव, तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कुलची राही पखाले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय वाईची वैष्णवी महागंडे, पाचवा क्रमांक हुतात्मा परशुराम विद्यालय वडुजची गायत्री पवार, सहावा क्रमांक छत्रपती शिवाजी हायस्कूल वडुजचा संकेत संजगणे, सातवा क्रमांक कन्या शाळा वाईची तजमिल इनामदार, आठवा क्रमांक अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाची सिद्धी कांबळे, छत्रपती शिवाजी हायस्कूल वडुजची ऋतुजा माळवे, दहावा क्रमांक महाराजा सयाजीराव विद्यालय सातारची सिद्धी मुळीक, कन्या शाळा वाईची मधुरा घोडके, पाचवी सीबीएसईमध्ये राज्यात नववा क्रमांक पोतदार स्कुलचा वरद रांजणे, ग्रामीणमध्ये राज्यात पाचवा क्रमांक जय भवानी विद्यालय पाचवडचा शिवेंद्र घाडगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विध्यानगरची निशा लव्हे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तायघाटची आर्या पार्टे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निनामची अनुष्का जाधव, 6वा क्रमांक श्री संत तुकाराम विद्यालयाचा अभिनव आव्हाड, 7 वा क्रमांक जय भवानी विद्यालय पाचवडचा अथर्व भोसले, नववा क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझेरी पु.चा विश्वराज पोमाणे, दहावा क्रमांक हनुमान विद्यालय पळशीचा आर्यन आघाव, शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचा राज जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझेरी पु. चा विश्वजित मांडवे, शहरीत राज्यात द्वितीय छत्रपती शिवाजी हायस्कूल वडुजचा प्रतीक काळे आणि माने देशमुख विद्यालय पाटणची प्रणाली मोळावडे, चौथा क्रमांक माने देशमुख विध्यालय श्रेयसी पुपलवड, 6 वा क्रमांक छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूजची जोगेश्वरी कोरे आणि सातवा क्रमांक अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचा वेदांत बनकर यांनी नंबर पटकावला आहे.त्यांचे अभिनंदन राज्याचे शिक्षण परिषदेचे रमेश चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, सुधीर महामुनी यांनी केले.
तालुकानिहाय शिष्यवृत्ती पास झालेले विद्यार्थीपुढीलप्रमाणे खटाव इयत्ता पाचवी(68),इयत्ता आठवी(88) एकूण 156, सातारा इयत्ता पाचवी(77), इयत्ता आठवी (98) एकूण 175, कराड इयत्ता पाचवी (84) इयत्ता आठवी(59) एकूण 143, माण तालुका इयत्ता पाचवी (20) इयत्ता आठवी 39 एकूण 59, फलटण तालुका इयत्ता पाचवी 48 इयत्ता आठवी 24 एकूण 72, खंडाळा तालुका इयत्ता 5 वी 16, इयत्ता 8 वी 39 एकूण 55, वाई तालुका इयत्ता 5 वी 52, इयत्ता 8 वी 30 एकूण 82, जावली तालुका इयत्ता 5 वी 32 तर 8 वी 17 एकूण 49, महाबळेश्वर इयत्ता 5 वी 17 व इयत्ता 8 वी 3 असे एकूण 20, कोरेगाव इयत्ता 5 वी 25 इयत्ता 8 वी 31एकूण 56, पाटण इयत्ता 5 वी 35, इयत्ता 8 वी 50 अशी एकूण 85 उत्तीर्ण झाले आहेत.