प्रतिनिधी/ बेळगाव
वरेरकर नाटय़ संघातर्फे शुक्रवार दि. 15 ते 19 जानेवारीदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, हेमकुमार टोपीवाला यांच्या चित्राकृती व नम्रता मौर्य यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता कलानिकेतन कोल्हापूरचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.