चिकोडी येथील महिलेसह दोघा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी जिल्हय़ातील आणखी 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिकोडी तालुक्मयातील एक 63 वषीय वृद्ध व 75 वषीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनावर मात केलेल्या 30 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजवरचा मृतांचा आकडा 880 वर पोहोचला आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 78 हजार 721 वर पोहोचली आहे. त्यापैकी 77 हजार 415 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 426 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
अद्याप 3 हजार 603 जणांचे अहवाल यायचे आहे. गुरुवारी बेळगाव तालुक्मयात 19, चिकोडी तालुक्मयात 14, अथणी तालुक्मयात 6, गोकाक तालुक्मयात 4, हुक्केरी तालुक्मयात 3 तर रामदुर्ग, रायबाग, बैलहोंगल तालुक्मयात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. सौंदत्ती व खानापूर तालुक्मयात एकही रुग्ण आढळला नाही.
हिंदवाडी परिसरातील एकाच कुटुंबातील चौघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. अळवण गल्ली-शहापूर, कॅम्प पोलीस ठाणे, जाधवनगर, महांतेशनगर, रामनगर, सह्याद्रीनगर, विजयनगर, विनायकनगर, टी. व्ही. सेंटर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून एका खासगी डॉक्टरचाही यामध्ये समावेश आहे.