84 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण जिल्हय़ात अद्याप 84 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत.
अद्याप 2,490 हून अधिक जणांचे अहवाल यायचे आहेत. शुक्रवारी हिंडलगा, सांबरा, मजगाव, शिवाजीनगर, पांगिरे, पामलद्दिनी व देशनूर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. लक्षणे असणाऱयांवर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 5 लाख 4 हजार 190 हून अधिक जणांची स्वॅब तपासणी केली आहे. त्यापैकी 4 लाख 72 हजार 103 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 792 वर पोहोचली असून आतापर्यंत 26 हजार 365 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या एक-दोन महिन्यांपासून कोरोना रुग्ण संख्येत मोठय़ा प्रमाणात घट दिसून येत आहे. आरोग्य विभागाने स्वॅब तपासणीही कमी केली आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. कागदोपत्री रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात स्वॅब तपासणी कमी झाल्याने साहजिकच पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी दिसून येत आहे.
लसीकरणाचे कामही संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत 47 हजार 475 जणांना लस देण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. त्यापैकी केवळ 28 हजार 650 जणांना लस देण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना शुक्रवारी घरी पाठविण्यात आले आहे.
मास्कमुळे चेहऱयावर पुरळ
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मास्क, सामाजिक अंतर सक्तीचे केले आहे. काही जणांना सतत मास्क वापरल्यामुळे चेहऱयावर पुरळ उठत आहेत. वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर न दिल्यामुळे असे प्रकार घडतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 14 फेब्रुवारीपासून कोरोना योद्धय़ांना दुसऱया टप्प्यातील लसीकरणाला प्रारंभ होणार आहे.