तालुक्मयातील 473 जणांचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
शुक्रवारी पुन्हा कोरोनाचे 1080 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असूनदेखील नागरिकांमध्ये याबाबत गांभीर्य दिसत नाही आहे. जीवनावश्यक वस्तू तसेच इतर वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडत आहे. ही बाब धोक्मयाची आहे. तेव्हा रुग्णांचा वाढता आकडा पाहून तरी नागरिकांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
शुक्रवारी तालुक्मयामध्ये 473 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहरातील 390 जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील 83 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गुरुवारी तब्बल 1604 रुग्ण आढळले होते. अशीच परिस्थिती राहिल्यास हा आकडा तिप्पटीने वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी विनायकनगर, आदर्शनगर, अमाननगर, भाग्यनगर, अनगोळ, आनंदवाडी-शहापूर, अंजनेयनगर, एपीएमसी मार्केटयार्ड, अशोकनगर, अयोध्यानगर, आजमनगर, बसव कॉलनी, शहापूर, बसवणकुडची, बसवेश्वरनगर, हिंडाल्को कॉलनी, हिंदवाडी, जाधवनगर, जयनगर-हिंडलगा, वडगाव, कपिलेश्वर कॉलनी, रविवारपेठ, खडेबाजार, कुवेंपूनगर, कॅम्प, चन्नम्मानगर, चव्हाट गल्ली, धारवाड रोड, गणाचारी गल्ली, गोडसेवाडी, गुरुप्रसाद कॉलनी, हनुमाननगर, नेहरुनगर, नानावाडी, नार्वेकर गल्ली-शहापूर, नाझर कॅम्प-वडगाव, न्यू गांधीनगर, महांतेशनगर, महाद्वार रोड, माळमारुती, मंडोळी रोड, खासबाग, मारुती गल्ली, सुभाषनगर, श्रीनगर, शिवबसवनगर, शेट्टी गल्ली, टिळकवाडी, उद्यमबाग, केशवनगर, वैभवनगर, सदाशिवनगर, समर्थनगर, सह्याद्रीकॉलनी, संभाजी गल्ली, संगमेश्वरनगर, शाहूनगर, शांतीनगर, शास्त्राrनगर, वंटमुरी कॉलनी, वझे गल्ली-वडगाव, विष्णू गल्ली-वडगाव, विश्वेश्वरय्यानगर, येळ्ळूर रोड-वडगाव या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
तालुक्मयातील होनगा, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द, देसूर, एटीएस-सांबरा, बेळगुंदी, बस्तवाड, मच्छे, गणेशपूर, हलगीमर्डी, हिरेबागेवाडी, हुदली, के. के. कोप्प, काकती, कडोली, यमनापूर, बाळेकुंद्री, खनगाव, खनगाव बी.के., कुकडोळी, पंतबाळेकुंद्री, मारिहाळ, मार्कंडेयनगर-वाघवडे, मुचंडी, मुतगा, निलजी, धामणे, सांबरा, पिरनवाडी, येळ्ळूर, सुळेभावी, तारिहाळ, टिपुसुलताननगर-मच्छे या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या 5,717 वर
कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी 1080 आढळली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 5,717 वर जावून पोहोचली आहे. हा आकडा वाढतच चालला आहे. जिल्हय़ामध्ये यावेळी सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.