बेळगाव तालुक्यातील आणखी एकाचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी बेळगाव जिह्यातील आणखी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बेळगाव तालुक्मयातील एका 55 वषीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 342 वर पोहोचला आहे. जिह्यात 258 सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने शुक्रवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 25 हजार 917 वर पोहोचली असून 25 हजार 309 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 3 हजार 784 जणांचा अहवाल यायचा आहे. सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
आतापर्यंत जिह्यातील 3 लाख 16 हजार 695 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 2 लाख 85 हजार 247 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 35 हजार 576 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. शुक्रवारी बेळगाव तालुक्मयातील 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यमनापूर, अजमनगर, हिंडलगा, परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.