जिल्हय़ात 304 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू : दिवसभरात 284 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी / बेळगाव
शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या व बाधितांचा मृत्यूचा आकडा या दोन्हीत घट झाली आहे. जिल्हय़ात 304 नवे रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 284 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 112 जणांचा समावेश आहे.
एकूण बाधितांची संख्या 72 हजार 692 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 63 हजार 758 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 8 हजार 254 सक्रिय रुग्ण आहेत. पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 680 वर पोहोचला आहे. चिकोडी तालुक्मयातील दोन, हुक्केरी, गोकाक व बेळगाव तालुक्मयातील प्रत्येकी एक अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
बेळगाव पाठोपाठ चिकोडी, हुक्केरी, रायबाग, अथणी तालुक्मयात बाधितांची संख्या अद्याप वाढतीच आहे. आतापर्यंत 8 लाख 68 हजारहून अधिक जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 87 हजार 797 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 3 हजार 342 जणांचा अहवाल यायचा आहे.
सांबरा एटीएसमधील आणखी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हलगीमर्डी, बेनकनहळ्ळी, बोकनूर, बसुर्ते, गौंडवाड, हिंडलगा, होनीहाळ, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, गजमनाळ, काकती, मुतगा, तुरमुरी, सांबरा, सावगाव रोड, सुळेभावी, मच्छे, येळ्ळूर, नानावाडी, अनगोळ, अलारवाड, आनंदवाडी-शहापूर, अनंतशयन गल्ली, राणी चन्नम्मानगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
अशोकनगर, बसव कॉलनी, आझमनगर, भाग्यनगर, मजगाव, टिळकवाडी, हिंडाल्को कॉलनी, खासबाग, रामतीर्थनगर, हिंदूनगर, के. के. कोप्प, कल्याणनगर-वडगाव, कुवेंपूनगर, लक्ष्मी टेकडी, महाद्वार रोड, कणबर्गी, ओमनगर, आरटीओ सर्कल, सदाशिवनगर, संगमेश्वरनगर, समृद्धी कॉलनी, शाहूनगर, शिवबसवनगर, सुभाषनगर, पार्वतीनगर परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत.