बेळगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू, 54 जण झाले बरे
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी बेळगाव जिल्हय़ातील 114 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर 54 जणांनी कोरोनावर मात केली असून बेळगाव तालुक्मयातील एका 46 वषीय व्यक्तीचा खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. बेळगाव, चिकोडी व रायबाग तालुक्मयात अद्याप रुग्णसंख्या वाढतच आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांच्या आकडय़ाने 76 हजार 33 चा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 73 हजार 520 जणांनी कोरोनावर मात केली असून अद्याप 1 हजार 727 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हय़ातील 1 हजार 911 जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. तर मृतांचा सरकारी आकडा 786 वर पोहोचला आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 9 लाख 60 हजार 659 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 78 हजार 443 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 52 हजार 624 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
जिल्हय़ातील बेळगाव, चिकोडीसह आणखी काही तालुक्मयांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी गोजगा, काकती, बाळेकुंद्री के.एच., सावगाव, मुतगा, वडगाव, हिंदवाडी, सांबरा, रामतीर्थनगर, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, शाहूनगर, श्रीनगर, टिचर्स कॉलनी, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.