6 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 123 वर
प्रतिनिधी / बेळगाव
शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 15 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बेळगाव शहरातील पाच जणांचा समावेश आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 123 वर उतरली आहे.
न्यू वीरभद्रनगर, शास्त्राrनगर, राणी चन्नम्मानगर, रामतीर्थनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून चिकोडीतील एका महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाला आणखी 1442 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 687 वर पोहोचली आहे. यापैकी 26 हजार 219 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 29 हजार 603 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 342 जण दगावले असून कोरोना योद्धय़ांना लसीकरणाची मोहिमही सुरू झाली आहे.