285 जण कोरोनामुक्त, बरे झालेल्यांची संख्या वाढली
प्रतिनिधी / बेळगाव
शुक्रवारी जिल्हय़ातील आणखी 271 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 14 हजारांच्या घरात पोहोचली असून मृतांचा सरकारी आकडा शुक्रवारी 203 वर पोहोचला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 95 जणांचा समावेश आहे.
शुक्रवारच्या अहवालात पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, आयटीबीपीचे जवान आदींचा समावेश आहे. मच्छे येथील राज्य राखीव दलाच्या दहा पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर पोलीस हेडक्वॉर्टर्समधील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एपीएमसी, हुक्केरी पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक पोलिसालाही कोरोनाची लागण झाली आहे.
शुक्रवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील एकूण पाच खासगी डॉक्टर व पाच वैद्यकीय कर्मचाऱयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 285 जणांची सुटका करण्यात आली असून आतापर्यंत 9 हजार 814 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3 हजार 745 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी बेळगाव तालुक्मयातील 95 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहर व उपनगरांतील 61 व ग्रामीण भागातील 34 जणांचा यामध्ये समावेश आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 1 लाख 4 हजार 447 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 88 हजार 518 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आणखी 27 हजार 126 जण होमकेअरमध्ये आहेत. प्रशासनाला 1159 अहवालांची प्रतीक्षा आहे. बेळगाव तालुक्मयातील 3, हुक्केरी, अथणी, चिकोडी तालुक्मयातील 3 असे एकूण सहा जण कोरोनामुळे दगावले आहेत.
डॉक्टर, पोलिसांबरोबरच आयटीबीपीचा एक जवान व दोघा बँक कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. बेळगाव-गोवा महामार्गाचे काम करणाऱया दोन कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उपलब्ध माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मात्र सरकारी बुलेटिनमध्ये कमीत कमी उल्लेख करण्यात येत आहे.
अनगोळ, पिरनवाडी, कर्ले, बसव कॉलनी, शिवाजीनगर, हनुमाननगर, गौंडवाड, मणगुत्ती, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, गोंधळी गल्ली, श्रीनगर, विष्णू गल्ली-वडगाव, नाझर कॅम्प-वडगाव, तेग्गीन गल्ली-वडगाव, आदर्शनगर-वडगाव, गणेशपूर, गणेशपूर गल्ली-शहापूर, विद्यानगर, टिळकवाडी, शाहूनगर, सरस्वतीनगर, सिंधी कॉलनी, अशोकनगर, टी. व्ही. सेंटर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
विजयनगर, मंगळवारपेठ-टिळकवाडी, भाग्यनगर, मारिहाळ, कंग्राळी खुर्द, काकती, सावगांव, गोवावेस, चव्हाट गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, काळी आमराई, मच्छे, हुंचेनहट्टी, मराठा कॉलनी-टिळकवाडी, बुधवारपेठ-टिळकवाडी, गांधीनगर, विनायकनगर, हिंडलगा, बेनकनहळ्ळी, डी. सी. कंपाऊंड, कंग्राळी बी. के., नेहरुनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.