201 रुग्ण झाले कोरोनामुक्त, अद्याप 1 हजार 470 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील कोरोना बाधितांचा आकडा 77 हजार 385 वर पोहोचला आहे. त्यापैकी 75 हजार 76 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी 70 नवे रुग्ण आढळून आले असून दोघे जण दगावले आहेत.
गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या 201 जणांना घरी जावू देण्यात आले आहे. अद्याप 1 हजार 470 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. बेळगाव व चिकोडी तालुक्मयातील दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा सरकारी आकडा 839 वर पोहोचला आहे. अद्याप 2,525 हून अधिक जणांचे अहवाल यायचे आहे. आतापर्यंत 10 लाख 8 हजार 826 जणांची स्वॅबतपासणी करण्यात आली आहे. यापैकी 9 लाख 29 हजार 93 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र बेळगाव व चिकोडी तालुक्मयातील रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे.
बेळगाव व चिकोडी वगळता अथणी तालुक्मयात 3, बैलहोंगल तालुक्मयात 6, हुक्केरी तालुक्मयात 3, रायबाग तालुक्मयात 3, रामदुर्ग तालुक्मयात 1, खानापूर व गोकाक तालुक्मयात प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टाप्लसचा धोका ओळखून बेळगावच्या सीमेवर खबरदारी वाढविण्यात आली आहे.
आंबेवाडी, हिंडलगा, बाळेकुंद्री खुर्द, कंग्राळी खुर्द, आंबेडकरनगर, हनुमाननगर, हिंदवाडी, नानावाडी, नेहरुनगर, ओंकारनगर, शहापूर, सह्याद्रीनगर, टिळकवाडी परिसरात शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बेळगाव शहर व उपनगरांमध्ये 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.